हिंसाचारावर उतारा; बंगालमधील भाजपाच्या आमदारांना केंद्र सरकारची X दर्जाची सुरक्षा

X security for BJP MLAs in Bengal - Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उफाळलेल्या हिंसाचारामुळे केंद्र सरकारने राज्यातील भाजपाच्या सर्व ७७ आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सुरक्षा ताफ्यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कमांडोंचा समावेश असेल.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करत आहेत, असा आरोप आहे. या हिंसाचाराची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय समिती पश्चिम बंगालमध्ये पाठवली होती. या समितीने गृहमंत्रालयाला माहिती दिल्यानंतर भाजपाच्या सर्व आमदारांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला.

भाजपाच्या ७७ पैकी ६१ आमदारांना एक्स दर्जाची सुरक्षा असेल. तर १५ आमदारांसाठी वाय दर्जाची सुरक्षाव्यवस्था असेल. नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांना केंद्र सरकारने यापूर्वीच झेड दर्जाची सुरक्षा देऊ केली होती.

केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला

या संदर्भात उल्लेखनीय आहे कि, काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. मुरलीधरन यांच्या गाडीच्या काच फोडण्यात आल्या, ते थोडक्यात बचावले. हा हल्ला तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला, असा आरोप व्ही. मुरलीधरन यांनी केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button