किराणा खरेदी करताना कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पवारांनी दिला हा सल्ला

Grocery Shopping Tips By Sharad Pawar

मुंबई : देशात अजूनही करोना व्हायरसची साखळी तुटलेली नाही. उलट आता अधिक वेगाने करोना व्हायरस देशामध्ये पसरत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आजपासून चौथा लॉकडाउन सुरु झाला आहे. करोना व्हायरस फक्त श्वसनक्रियेद्वारेच पसरतोय असे नाही, तर सामाजिक अंतराच्या बरोबरीने वस्तुंची खरेदी करताना सुद्धा आपल्याला काळजी घेण्याची फार गरज आहे. त्या दृष्टीने राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी किरणा वस्तुंच्या दुकानात खरेदी करताना कुठली काळजी घेतली पाहिजे, त्यासंबंधी महत्वाचा सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी त्यांच्या टि्वटर हँडलवरुन ही माहिती पोस्ट केली आहे.

जेंव्हा तुम्हा किराणा दुकानात जाता तेंव्हा दोन व्यक्तींच्या मध्ये एक मीटरचे अंतर ठेवा असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. डोळे, नाक व तोंडाला हात लावायचे टाळा. सुपरमार्केटमध्ये खरेदी करत असाल तर ट्रॉलीचे हँडल सॅनिटायजरने निर्जंतुक कराण्याचा सल्ला दिला आहे. खरेदीनंतर व वस्तु घरी आणल्यानंतर तुमचे हात निर्जंतुक करुन घ्या. अन्नपदार्थांच्या पॅकेटच्या संपर्कात आल्यामुळे करोनाची बाधा झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतु तरीही दक्षता महत्वाची असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी त्यांच्या टि्वटर हँडलवरुन खबरदारी घेण्याचा हा सल्ला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला