तुम्ही तुमचे कुटुंब सांभाळा, आम्ही आमचे सांभाळतो; फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

पुणे :- पिंपरी चिंचवडमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आले होते. यावेळी फडणवीस यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, या शासकीय योजनेची खिल्ली उडवली. ‘कोरोनाच्या काळात महाराष्ट्र सरकारने समाजातील कोणत्याही घटकाला मदत केली नाही.

इतर राज्यांनी आर्थिक पॅकेज दिले आहे. केवळ तुम्ही तुमचे कुटुंब सांभाळा, आम्ही आमचे सांभाळतो एवढेच काम केले’ अशी टीका भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray) केली. ‘कोविडच्या काळात देशातील मंत्री, मुख्यमंत्री जेव्हा मोदींवर टीका करत होते, तेव्हा ते जनतेच्या सेवेत होते. पंतप्रधान मोदी हे कर्मयोगी आहेत. लोकांना बोलघेवडे आवडत नाहीत. इतर राज्यांनी आर्थिक पॅकेज दिले आहे. केवळ तुम्ही तुमचे कुटुंब सांभाळा, आम्ही आमचे सांभाळतो एवढेच काम केले’ असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

ठाकरे सरकार वेगवेगळ्या घोषणा करते आणि घोषणेवरून मग जाते. त्यामुळे हे सरकार पलटूराम सरकार आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘वर्षभरात केवळ स्थगित्या देणं आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करून माल कमविणे एवढेच या सरकारचे काम सुरू आहे.’ असा आरोपही फडणवीस यांनी केला.

ही बातमी पण वाचा : माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा मंत्र पुढेही पाळण्याची गरज – सामना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER