सणांच्या काळात कोरोनाबाबत काळजी घ्या – पंतप्रधानांचे आवाहन

PM Modi

दिल्ली : कोरोनाचा (Corona) लॉकडाऊन संपला पण कोरोनाचा विषाणू कायम आहे. सणांच्या काळात, सण साजरे करताना कोरोनाच्या बचावाची काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले.

आज देशाला संबोधित करताना ते म्हणाले – कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनता कर्फ्यू, लॉकडाऊन हे उपाय करून झालेत. स्थिती थोडी सुधारल्याने व्यवहार हळुहळू खुले करण्यात आलेत. आर्थिक चक्राला गती मिळाली. ‘कोरोना-योध्या’ डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्यात बरीच मदत झाली.

देशात कोरोनाच्या रुग्णांसाठी ९० लाख खाटा उपलब्ध आहेत. १२ हजार विलगीकरण केंद्र आहेत. चाचणीसाठी २ हजार लॅब आहेत. लवकरच चाचण्यांचा आकडा १० कोटींच्या पार जाईल. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आणि रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती मोदी यांनी दिली.

कोरोनाची लस येईपर्यँत काळजी हेच कोरोनावरचे औषध आहे. लस आल्यानंतर ती सर्वांना मिळावी याची व्यवस्था सरकार करते आहे. तोपर्यंत सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. जे काळजी घेत नाहीत ते स्वतःसोबत कुटुंब, नातेवाईक आणि समाजासाठी धोका निर्माण करत आहेत, असा इशारा त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER