सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याची दक्षता घ्या; अजित पवार यांचा इशारा

Ajit Pawar

पुणे :- पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात काही घटकांना ठराविक वेळेत व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी (Public places) गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली. ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे, असे ते म्हणालेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती घेतली.

ही बातमी पण वाचा : नारायण राणे मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण का नाही दिले, अजित पवारांचा सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button