पोहरादेवी गडावरील शक्तीप्रदर्शनावर कारवाई करा; प्रविण दरेकरांची मागणी

Parvin Darekar

पोहरादेवी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २१ फेब्रुवारीला जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. आपण थोडं फिरायला लागलो. लग्नावरची बंधने अजूनही आहेत. कोरोनाची (Corona) शिस्त मोडू शकत नाही. समजूतदारपणे सूचनांचे पालन करा, असे आवाहन त्यांनी केले होते. मात्र,शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासला.

संजय राठोडांच्या समर्थकांनी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा केला. जिल्हा प्रशासनाने फक्त ५० जणांना हजर राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, तरीही पोलिसांना न जुमानता समर्थकांनी मोठी गर्दी केली. राठोड यांच्या स्वागतासाठी हजारो समर्थक मंदिर प्रवेशद्वारावर दाखल झालेत. पण या ठिकाणी समर्थकांची गर्दी वाढल्याने पोलिसांचा लाठीचार्ज ‘ऍक्शन मोड’ चालू झाला.

पोहरादेवी येथे कोरोनाची कोणतीही काळजी न घेता शक्तिप्रदर्शन सुरू आहे, या ठिकाणी मुख्यमंत्रांच्या आदेशाचे सरळ उल्लंघन केले जात आहे, जिल्हाप्रशासनने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली. संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येण्याचे नाटक केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाजिक दबावाला बळी पडू नये, असेही त्यांनी आवाहन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER