संजय राठोड यांच्यावर कारवाई करा; चित्रा वाघ यांचे डीजीपींना निवेदन

पुणे : पूजा चव्हाणच्या (Pooja Chauhan) मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. तिने आत्महत्या केली, बाल्कनीतून पडून तिचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी म्हटले आहे. पूजाच्या आईवडिलांनी आमची कोणाबाबत तक्रार नाही, असा जबाब दिला आहे. पूजा चव्हाण इंग्लिश स्पिकिंग कोर्ससाठी पुण्यात आली. त्यानंतर तिने आत्महत्या केल्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणात शिवसेनेचे (Shiv Sena) वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव समोर आले. भाजपाने (BJP) टीकेची झोड उठवली. आज याप्रकरणात भाजपा नेत्या चित्र वाघ (Chitra Wagh) यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांची भेट घेऊन संशयित मुख्य आरोपी मंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करा, यासंदर्भात निवेदन दिले आहे.

प्रसिद्धीमाध्यमातून समोर आलेल्या बातम्यांनुसार तिची आजी, भाऊ यांनी मात्र आमची मुलगी आत्महत्या करणारी नव्हती. ही हत्या असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी केली. दरम्यान १२ ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या. ज्यात हा आवाज कोण दुसरा तिसऱ्याचा नसून वनमंत्री संजय राठोडचा आहे. काही फोटोही आहेत, ज्यात पूजा ही संजय राठोडच्या संपर्कात होती, हे दिसत आहेत. इतके ढळढळीत पुरावे असतानाही पुणे पोलीस मात्र संजय राठोड यांच्यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. विशेष म्हणजे मंत्री संजय राठोड अद्याप बेपत्ता आहे, असे वाघ यांनी निवेदनात म्हटले आहे.

पुणे पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी पूजाप्रकरणातला अहवाल राष्ट्रीय महिला आयोग तसेच राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे सुपूर्द केला. परंतु या प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी संजय राठोड यांच्या चौकशीशिवाय अहवाल पूर्ण कसा काय होऊ शकतो, याप्रकरणाची साधी चौकशीही पुणे पोलिसांनी केली नाही, असा सवाल वाघ यांनी उचलून धरला आहे. पूजाचा लॅपटॉप, तिचा मोबाईल, पोलिसांना मिळाले का? त्यातून काही माहिती समोर आली का? १२ ऑडिओ क्लिप्स बाहेर असून तपासणी केली का? पूजा गॅलरीतून पडली म्हणताना तिच्यासोबत राहणाऱ्या दोन मुलांना जे घटनेचे प्रत्यक्षदर्शी होते, त्यांची जुजबी चौकशी करून पोलिसांनी कसे काय सोडून दिले, त्यांना त्यावेळीच ताब्यात का नाही घेतले ? नंतर शोधपथक पाठवले, तेव्हा दोन्ही फरार होते. त्यातल्या एकाला परवा पकडले, दुसरा अजूनही फरार आहे. मंत्री संजय राठोड बेपत्ता आहे. या प्रकरणात पोलिसांची भूमिका ही अतिशय संदिग्ध आहे. या प्रकरणात पूजाला न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात चित्र वाघ यांनी नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER