नवनीत राणा यांच्यावर कारवाई करा; लोकसभेच्या सभापतीकडे अडसूळ यांची मागणी

Maharashtra Today

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana)यांचं न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर लोकसभेच्या सभापतीनी नवनीत राणा यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राणा यांचे राजकीय प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नेते आनंद अडसूळ यांनी केली. याबाबत मी राष्ट्रपती आणि पंतप्रधानाही पत्र पाठवणार आहे, असे ते म्हणालेत.

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हणालेत की, नवनीत राणा यांच्या खोट्या जात प्रमाणपत्रावर मी सुरुवातीपासूनच आक्षेप घेऊन आवाज उठविला आहे. यापुढेही सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. खोटी प्रमाणपत्रे सादर करून त्यांनी निवडणूक लढवली.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अमरावती हा एससी राखीव मतदार संघ आहे. जात प्रमाणपत्र असल्याशिवाय खासदारकी कायम राहत नाही. आता राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button