पंचगंगा प्रदूषणास जबाबदार कारखान्यांवर कारवाई करा : सौरभ राव

पुणे :- प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात पंचगंगा प्रदूषणास (Panchganga Pollution) जबाबदार असणाऱ्या कारखान्यांवर त्वरित कारवाई करा, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव (Saurabh Rao) यांनी गुरुवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत दिले.

पंचगंगा प्रदूषणाबाबत गुरुवारी राव यांनी जिल्हा परिषद, महापालिका, जिल्हा प्रशासन, नगरपालिका मुख्याधिकारी आणि पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते यांची संयुक्त ऑनलाईन बैठक घेतली.

समाजातील सर्वच घटकांचा सहभाग असेल तरच पंचगंगा प्रदूषणमुक्त होईल. त्यासाठी सर्व सर्वच घटकांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे, अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केली.

कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत तीन नाल्यांतील सांडपाणी प्रक्रियेसाठी प्रस्तावित असणारे प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत.

तसेच घनकचऱ्याचे विकेंद्रीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील हॉटेल्स, सर्व्हिसिंग सेंटर, हॉस्पिटल्स, मंगल कार्यालये, लाँड्री यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी विशेष प्रयत्न करावेत. प्रशासनातर्फे तंत्रज्ञ, यंत्रसामग्री उपलब्ध होऊ शकते. मात्र, प्रदूषण रोखण्यासाठी केवळ यांचा उपयोग होणार नसून, समाजातील सर्वच घटकांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे, असेही राव यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER