डिग्री नसलेल्या डॉक्टरवर कारवाई करा; राष्ट्रवादीचा रामदेवबाबांवर निशाणा

ramdev baba - Nawab Mailk - Maharashtra Today

मुंबई :- ज्या व्यक्तीने कुठल्याही मेडिकल कौन्सिलकडून कोणत्याही प्रकारची डिग्री मिळवलेली नाही. ती व्यक्ती उपचाराबाबत सल्ला देऊ शकत नाही. ज्या व्यक्तीकडे अशा प्रकारची डिग्री नसेल अशा डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रामदेवबाबा यांच्याकडे आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री असेल तरच ते प्रचार व उपचारांबाबत लोकांना सल्ले देऊ शकतात.

मात्र आपले दुकान, कारभार चालवण्यासाठी वक्तव्य करत असतील तर हे योग्य ठरणार नाही, असे मलिक यांनी म्हटले. केंद्रीय आरोग्य विभागाने रामदेवबाबा यांचे विधान गांभीर्याने घ्यायला हवे. देशात अलोपॅथी, आयुर्वेद, युनानी मेडिसीन, होमिओपॅथीच्या औषधांना मान्यता देण्यात आलेली आहे. त्यासाठी वेगवेगळे मेडिकल कौन्सिल बनवण्यात आले आहेत. वैज्ञानिक पद्धतीने जी थेरपी आहे तिला मान्यता आहे. त्यानुसार उपचार करण्याची व्यवस्था तयार करण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले. रामदेवबाबा डॉक्टर नाहीत. कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकल कौन्सिलची डिग्री त्यांनी घेतलेली नाही. परंतु उपचारांबाबत ते सतत काही विधाने करत आहेत.

अलोपॅथीवर वक्तव्य करत आहेत. आयुर्वेदावरून (Ayurved) उपचाराचे सल्ले देत आहेत. रामदेवबाबा यांच्या उत्पादनाचे उद्घाटन करण्यासाठी देशाचे आरोग्यमंत्री जातात यापेक्षा दुर्दैवी बाब नाही. देशाच्या संविधानात वैज्ञानिक पद्धतीने संपूर्ण देशाचे कामकाज चालते. अविश्वास, अंधविश्वासाचा प्रचार कोण करत असेल तर ते देशाला घातक असल्याचेही मलिक म्हणाले.

ही बातमी पण वाचा : सत्ता येणार… ही भाजपची भविष्यवाणी कधीच सत्य होत नाही; नवाब मलिकांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button