‘एक पाऊल पुढे टाका !’ महाविकास आघाडीतील आमदारांना भाजप नेत्याची खुली ऑफर

Nitesh Rane

मुंबई : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा  निकाल पाहता भाजपचे समाधान आवताडे यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे . तर महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार भगीरथ भालकेंचा येथून पराभव होत असल्याचे चित्र आहे.  भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तर महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) आमदारांना थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर देऊ केली आहे. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर एक संदेश पोस्ट केलाय. ते लिहितात, ‘पंढरपूर पोट निवडणुकीमध्ये  MVA मंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले. तरीही लोकानी नाकारले. MVA मधल्या आमदारांना हा संदेश आहे. येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका. भाजप हा एकच पर्याय आहे. महाराष्ट्राची जनता आमच्याबरोबर आहे!’ असे ट्विट राणे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button