
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी जाहीर झाला आहे. १ मार्च ते २८ मार्चपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे. मात्र, २५ फेब्रुवारीला कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अधिवेशनाचा कालावधी किती ठेवणार, याचा निर्णय होणार आहे. दरम्यान, ८ मार्चला अर्थसकंल्प सादर केला जाणार आहे.
अधिवेशन आल्यामुळे कोरोना (Corona) रुग्णांचे आकडे वाढलेत असे नाही. कोरोना कालावधीत त्यांचा लोकसभेच्या अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. दुसरा टप्पा ८ तारखेला पूर्ण करणार आहेत. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी ४ आठवड्याचे अधिवेशन झाले पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अधिवेशनाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न समोर येतात. काही उपाययोजना होत असतात. आज वीज बिलाच्यासंदर्भात गंभीर परिस्थिती आहे. ७५ लाख लोकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. लोकांचे कनेक्शन कापले जात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशाप्रकारे वीज कनेक्शन कापणे, यापूर्वी कधीही पाहिले नाही. जर सभागृह घेतले नाही, तर हे प्रश्न मांडायचे कुठे? त्यामुळे पूर्ण ४ आठवड्याचे अधिवेशन केले पाहिजे.
देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल
“आता सरकारने अधिवेशनाचा कालावधी गुलदस्त्यात ठेवला आहे, त्यामुळे पुन्हा बीएससी घेऊ असे त्यांचे चालले आहे. पण त्यांनी कालावधी कमी केला तर प्रश्नापासून पळं काढण्यासाठी हे करत आहेत, असा त्याचा अर्थ होईल. केंद्र सरकारमध्ये रोज चर्चा होत असतात. जितके दिवस पाहिजे, तितके दिवस चर्चा होत असतात. आझाद मैदानावर इतके दिवस शिक्षक बसले आहेत, कुठे चर्चा आहेत? पाहिजे तेवढे आंदोलन करा, आम्ही लक्ष्यचं देणार नाही.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर (Mahavikas Aghadi) केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला