१०९ वर्षांपूर्वी बुडालेले टायटॅनिक जवळून पाहा! पॅकेजचा खर्च…

Maharashtra Today

‘कधीच न बुडणारे’ अशी जाहिरात केलेले टायटॅनिक(Titanic ) हे प्रचंड जहाज त्याच्या पहिल्या सफरीत, १४ – १५ एप्रिलच्या रात्री बुडाले! १०९ वर्षांपूर्वी बुडालेले हे जहाज आता समुद्रात जाऊन पर्यटकांना पाहता येणार आहे. हे पॅकेज आहे १ लाख २५ हजार डॉलर्सचे (1 Lakh 25 thousand dollars)(म्हणजे ९१ लाख ४६ हजार रुपये). यात समुद्राखाली १० दिवस राहणे, टायटॅनिकचे जवळून निरीक्षण आणि प्रत्यक्ष स्पर्श करण्याची संधी आहे. बेलफास्टमध्ये निर्मित टायटॅनिक हे अतिभव्य आणि अलिशान जहाज २२२३ प्रवाशांसह न्यूयॉर्कच्या पहिल्या सफरीवर १४ एप्रिल १९१२ रोजी निघाले.

त्याच रात्री उत्तर अटलांटिक समुद्रात एका हिमनगाला धडकल्याने त्याचे दोन तुकडे झाले आणि त्याला जलसमाधी मिळाली. या अपघातात १५०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.यानंतर टायटॅनिकवर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, चित्रपट निघाले. ९७ वर्षांच्या सततच्या शोधानंतर १९८५ मध्ये अटलांटिक समुद्रात सुमारे १२ हजार ४६७ फूट खोल पाण्यात टायटॅनिकचा सांगाडा सापडला. समुद्रात शोध घेणाऱ्या ‘ओशनगेट एक्स्पीडीशन’ या कंपनीने टायटॅनिक जवळून पाहण्यासाठी ‘द टायटॅनिक सर्व्हेक्षण २०२१ प्रोजेक्ट’ तयार केला आहे.

या सफरीवर कुणीही जाऊ शकणार नाही. अर्जदारांपैकी कोण जाऊ शकेल याची निवड तज्ज्ञ समिती करणार आहे. पर्यटकांना पाणबुडीतून प्रवास करावा लागेल. त्यासाठी खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. १० दिवसांच्या या सहलीचे पॅकेज आहे १ लाख २५ हजार डॉलर्स.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button