ताडोबात होणार ‘ताज’चे पंचतारांकित हॉटेल

Taj's five star hotel will be in Tadoba

मुंबई : वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरात ‘ताज हॉटेल्स ग्रुप’ला पंचतारांकित हॉटेलसाठी सरकारने जागा दिली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि हॉटेल ताज यांच्यामध्ये गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा येथे पंचतारांकित पर्यटन केंद्र उभारण्याकरिता मंजुरी दिली आहे. ताज समूहाची ‘मे. इंडियन हॉटेल’ हे हॉटेल बांधणार आहे. यामुळे ताडोबा परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल. पर्यटन विभाग आणि थ्रायव्हिंग हॉटेल्स प्रा. लि. यांच्यामध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला.

याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ताडोबातील वाघ, राज्यातील विविध समुद्रकिनारे, जंगल, गडकिल्ले आपण जगासमोर चांगल्या पद्धतीने मांडले पाहिजे. पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढणे आवश्यक असून त्यासाठी राज्य सरकारमार्फत प्रोत्साहन देईल. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER