तैमूर झाला दोन वर्षाचा

मुंबई : सैफ अली खान आणि करीन कपूर यांचा मुलगा तैमूर आज २ वर्षाचा झाला आहे. इंटरनेटवॉर मोठ्या प्रमाणात ट्रॉल केल्या गेल्यामुळे तैमूरच्या लोकप्रियतेत बरीच भर पडली होती. त्याच्या या लोकप्रियतेमुळे तैमूर चे बाहुले ही बाजारात विक्रीला आले आहेत. सध्या तैमुर आपल्या आई वडिलांसोबत साऊथ आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात आपला वाढदिवस साजरा करायला गेला आहे.


सोशल मीडियावर त्याचे फोटो ही प्रचंड व्हायरल होत आहे. या तैमुरचा वाढदिवस २ आठवडे अगोदरच साजरा करण्यात आला.त्याची आई करिना कपूरने याचे आयोजन मुंबईत केले होते.

 ही बातमी पण वाचा : आता चिमुकल्यांना तैमूर बाहुल्याची भुरळ !

तैमुरच्या प्री-बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये बच्चे कंपनी सहभागी झाली होती. या पार्टीत इनाया नाओमी खेमू, आई सोहा अली खानसह हजर होती. रणवीजय सिंगची मुलगी काइनाथ सिंग, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य कपूर आणि इतर स्टार किड्स हजर होते. यावेळी त्याची मावशी करिश्मा कपूर, तिचा मुलगा किआन आणि तिची आई बबिता कपूर खास उपस्थित होत्या.