‘ताई, टेस्ट निगेटिव्ह आली तरी योग्य उपचार आणि काळजी घ्या’; धनंजय मुंडेंचा बहिणीसाठी काळजीयुक्त संदेश

Dhanajay Munde - Pritam Munde - Maharastra Today
Dhanajay Munde - Pritam Munde - Maharastra Today

बीड : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि मुंडे बहिणींमधला वाद जनतेला काही नवा नाही. नेहमीच मुंडे बहीण-भाऊ चर्चेत असतात. या दोन कुटुंबांमधले आरोप-प्रत्यारोप लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्येही पाहायला मिळते. शनिवारी संध्याकाळी खासदार पंकजा मुंडे यांची धाकटी बहीण प्रीतम मुंडे यांनी प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्यामुळे उपचार घेत असल्याचा व्हिडिओ ट्विट केला. यावर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. तसेच त्यांनी याबाबत ट्विटसुद्धा केले आहे.

“योग्य उपचार आणि काळजी घ्या”

धनंजय मुंडे यांनी ट्विटमध्ये प्रीतम मुंडे यांच्या व्हिडिओतील माहितीचा संदर्भ दिला आहे. “ताई, टेस्ट निगेटिव्ह आली असली, तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार आणि काळजी घ्या. प्रभू वैद्यनाथ कृपेने लवकर बऱ्या व्हाल ही खात्री आणि सदिच्छा व्यक्त करतो.” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

“गेल्या आठवड्यात १४ ते १८ एप्रिलमध्ये जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. १८ तारखेला मुंबईत आल्यानंतर मला कोरडा खोकला, सर्दी, ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवायला लागले. २१ तारखेला मी RT-PCR चाचणी केली. रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण सगळ्यांना मी आवाहन करते की, फक्त RT-PCR चाचणी निगेटिव्ह आली, म्हणून आपल्याला कोरोना नाही या भ्रमात राहू नका. जर आपल्याला लक्षणे असतील, तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. मी देखील माझ्या डॉक्टरांशी संपर्क साधला आणि त्यांनी दिलेली ट्रीटमेंट घरीच आयसोलेशनमध्ये राहून घेत आहे.” असा व्हिडीओ प्रीतम मुंडे यांनी ट्विट केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button