या अभिनेत्यामुळे अजूनही अविवाहित आहे तब्बू, सांगितली पूर्ण कथा

Tabu

बॉलिवूड अभिनेत्री तब्बू (Tabu)४ नोव्हेंबरला आपला ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रपटाच्या पार्श्वभूमीशी संबंधित असलेली तब्बू बर्‍याच वेळा चर्चेत होती. तब्बू अजूनही अविवाहित आहे, याचे जबाबदार ती अजय देवगणला ( Ajay Devgan) ठरवते. आपल्या कारकीर्दीत यशस्वी असूनही तीने लग्न का केले नाही, हे उत्तर तब्बूने एका मुलाखतीच्या वेळी दिले होते.

Tabu is single and Ajay Devgn is responsible for it, she hopes he repents  and regrets this | Entertainment News,The Indian Expressएका संभाषणात तब्बूने कबूल केले की अजय देवगनमुळेच ती अजूनही अविवाहित आहे. तब्बू म्हणते की लोक माझी अजयशी असलेली मैत्री चुकीच्या दृष्टिकोनातून पाहतात. खरं तर मी आणि अजय दोघेही खूप जवळचे मित्र आहोत. जसे आपण वेगवेगळ्या लोकांशी स्वतंत्र नाते तयार करता तसेच माझ्या आणि अजयच्या बाबतीतही असेच काहीतरी आहे. आमचे बंध फार खास आहेत. अजय देवगण बरोबरचे मी असे नाते सर्वांशी शेअर करू शकत नाही.

तब्बू पुढे म्हणते की आम्ही दोघेही २० वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. माझा चुलत भाऊ समीर हा अजयचा शेजारी आहे. मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये माझ्या कारकीर्दीत उंची गाठत होते तेव्हा अजय माझ्याबरोबर होता. मी खूप लहान होते तेव्हा अजय आणि समीर दोघेही बऱ्याच वेळा माझ्यामागे येत असत. जर मी एखाद्या मुलाशी बोलले तर दोघेही त्याला मारहाण करण्यास सुरुवात करायचे. मी या दोघांवर प्रेम करते. पण मी अविवाहित आहे, ते अजयमुळे आहे.

तब्बूने केलेल्या आरोपाचा अजयने दिले हे उत्तर

एका मुलाखतीत अजयला जेव्हा तब्बू अविवाहित असल्याबद्दल विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की तब्बूला माझ्यासारखा मुलगा हवा आहे. आणि आजपर्यंत तब्बूला माझ्यासारखा कोणीही सापडलेला नाही. म्हणूनच कदाचित ती अजूनही अविवाहित आहेत. काजोलला माझ्या आणि तब्बूच्या सखोल मैत्रीची जाणीव आहे आणि तीला सर्व सामान्य वाटते. ती म्हणते की ही एक सामान्य भावना आहे. मला काही हरकत नाही.