तबलिगी जमात हा तालिबान गुन्हा : मुख्तार अब्बास नकवी

Tabligi Jamaat is a Taliban crime- Mukhtar Abbas Naqvi

नवी दिल्ली :- तबलिगी जमात हा तालिबान गुन्हा आहे.त्यांचा हा गुन्हा माफीच्या लायकीचा नाही, असे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन मध्ये आयोजित तबलीगी जमात च्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांना करोनाची लागण झाल्याने मुख्तार अब्बास नकवी यांनी संताप व्यक्त केला आहे.

तबलिगी जमातच्या बेजबाबदार वागण्यामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

नकवी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “तबलिगी जमातचा तालिबानी गुन्हा. हा बेजबाबदारपणा नाही तर गंभीर गुन्हा आहे. जेव्हा संपूर्ण देश एकत्र होऊन करोनाशी लढा देत आहे तेव्हा अशा गंभीर गुन्ह्याला माफी दिली जाऊ शकत नाही”.

अब्बास नकवी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन इतर मुस्लीम नेत्यांसाठी एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी मुस्लीम नेत्यांना लोकांना आवाहन करण्याची विनंती केली आहे की, करोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी लॉकडाउन आणि इतर आदेशांचं कठोर पालन करा.


Web Title : Tabligi jamaat is a taliban crime – mukhtar abbas naqvi

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)