तापसीने पूर्ण केले ‘रश्मी रॉकेट’चे मैदानी प्रशिक्षण पूर्ण

Taapsee Pannu

साऊथप्रमाणेच बॉलिवुडमध्येही (Bollywood) तापसी पन्नूने (Taapsee Pannu) अत्यंत अल्पावधीच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. एखाद्या निर्मात्याला नायिकाप्रधान सिनेमा तयार करायचा असला तर त्यासाठी त्याच्या डोळ्यासमोर तापसी पन्नूचेच नाव येते. तापसीने मिळवलेले असे यश फार कमी नायिकांच्या वाट्याला येते. सध्या तापसी रश्मी रॉकेट नावाचा आणखी एक नायिकाप्रधान सिनेमा करीत असून खेळावर आधारित या सिनेमासाठी तापसीने मैदानी प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. सिनेमाच्या शूटिंगसोबतच तापसीने ट्रेनिंगही सुरु ठेवले होते. या सिनेमासाठी तापसीने तिचे वजनही कमी केले आहे.

तापसीने रश्मी रॉकेटचे (Rashmi Rocket) शूटिंग आणि ट्रेनिंगचा एक व्हीडियो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडियोमध्ये तापसी घाम गाळताना दिसत आहे. यात ती रनिंग करताना आणि वर्कआउट करतानाही दिसत आहे. पाण्याने भरलेल्या टबमध्ये धावण्याचा सराव करणारी तापसी पाहून या सिनेमासाठी ती किती कष्ट घेत आहे ते दिसून येत आहे. या व्हीडियोत ती म्हणते, शूटिंगचा तीसरा दिवस परंतु खूपच त्रासदायक. माझे शरीर हे कष्ट झेलू शकेल असे मला वाटत नाही. आज #RashmiRocket साठी मी शेवटचे अॅथलेटिक ट्रेनिंग पूर्ण केले आहे असेही तापसीने या व्हीडियोत म्हटले आहे.

‘रश्मि रॉकेट’ ही गुजरातच्या कच्छमधील रश्मी नावाच्या एका मुलीची कथा आहे. रश्मी लहानपणापासूनच धावण्यात पटाईत असते. तिचे धावणे पाहून गावकऱ्यांनी तिला रॉकेटची उपमा दिलेली असती. एका लहान गावातून येऊन आंतररष्ट्रीय स्तरावर रश्मी तसे यश मिळवते. यासाठी तिला किती कष्ट करावे लागतात हे दाखवणारा हा सिनेमा आहे. नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका धिल्लन यांनी ‘रश्मी रॉकेट’ची कथा लिहिली असून आकर्ष खुराना याचे दिग्दर्शन करीत आहे.

आकर्षने सिनेमाबाबत बोलताना सांगितले, “कोरोनाला सुरुवात झाली तेव्हा आम्ही सगळे शूटिंगसाठी तयार होतो. परंतु लॉकडाऊन झाला आणि शूटिंग करता आले नाही. परंतु आता आम्ही सिनेमाचे शूटिंग मोठ्या जोमाने करीत असून लवकरच शूटिंग पूर्ण होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER