कोरोना करणार टी-20 विश्वचषक स्पर्धेला आउट?

Maharashtra Today

भारतात कोरोनाचा (Corona) उद्रेक पाहता यंदा आॕक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणारी टी-20 विश्वचषक स्पर्धा (T20 world cup). धोक्यात आली आहे आणि बहुतेक कोरोना या स्पर्धेला आउट करणार अशी शक्यता आहे. कोरोनाची गंभीर स्थिती पाहाता काही संघांनी या स्पर्धेसाठी भारतात येण्याबद्दल शंका उपस्थित केली आहे. त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) काही पूर्ण सदस्य संघसुध्दा आहेत. दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या स्पर्धेचे सामने आयोजीत करण्यासाठी नऊ शहरांची प्राथमिक यादी निश्चित केली आहे आणि अंतिम सामना अहमदाबादला खेळविला जाणार आहे.

अहमदाबादशिवाय चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, धर्मशाला, लखानऊ, कोलकाता आणि मुंबई येथे विश्वचषक सामने होणार आहेत. मात्र आता वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी विविध राज्यात लाॕकडाऊन लावण्यात येत आहे. त्यामुळे काही प्रमुख संघांनी या स्पर्धेसाठी भारतात येऊन कसे खेळायचे याबद्दल साशंकता व्यक्त केली असल्याचे समजते.

आयसीसीच्या इव्हेंटस व लाॕजिस्टिक्स समितीतर्फे या महिन्याच्या शेवटी काही ठिकाणी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार होता पण आता कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने ही पाहणीसुध्दा लांबणीवर पडली आहे. यासंदर्भात आयसीसीच्या जूनमध्ये होणाऱ्या वार्षिक बैठकीत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

भारतातील स्थितीवर चिंता व्यक्त करणाऱ्या काही मंडळांनी ही स्पर्धा भारताऐवजी आॕस्ट्रेलियात घ्यावी असे मत मांडले आहे. आॕस्ट्रेलियातही पुढील वर्षीची टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. आॕस्ट्रेलियातील ही स्पर्धा नियोजनानुसार गेल्यावर्षीच होणार होती पण भारताने 2022 ची स्पर्धा आयोजित करण्यास नकार दिल्याने ती स्पर्धा आता आॕस्ट्रेलियात पुढील वर्षी होणार आहे. भारतात 2023 मध्ये वन डे क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button