टी-२० विश्वचषक भारतात की बाहेर? निर्णय होणार जुलैमध्ये

T20 World Cup - decision will be made in July

कोरोनामुळे (Corona) आयपीएल (IPL) स्थगित झाल्यानंतर यंदा नियोजनानुसार भारतात टी-२० ची विश्वचषक स्पर्धासुद्धा होऊ शकेल का, याबद्दल शंका व्यक्त होत आहे; मात्र याबाबतचा निर्णय यंदा जुलै महिन्याच्या वेळी कोरोनाच्या स्थितीचा अंदाज घेत घेण्यात येईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) एका सदस्याने वृत्तसंस्थेला सांगितले आहे. त्या वेळीच विश्वचषक (World Cup) आयोजन भारतात करायचे की भारताबाहेर याचा निर्णय होण्याची शक्यता या सदस्याने बोलून दाखवली.

आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सध्या थांबा आणि पाहा असे धोरण आहे; पण विश्वचषकासारखी महत्त्वाची स्पर्धा असल्याने निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारेल आणि विश्वचषक स्पर्धा ठरल्यानुसार होईल असा बीसीसीआयला विश्वास आहे. त्यासाठी नऊ ठिकाणी तयारी सुरू आहे, आणखी काही राखीव मैदानांवरसुद्धा तयारी सुरू आहे. परिस्थिती सुधारली नाही तर एकाच राज्याच्या आरोग्य सुविधेवर ताण नको अशी मैदानांची निवड करण्यात आल्याचे या सदस्यांनी सांगितले. सध्या अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगलुरु, धर्मशाला, हैदराबाद आणि लखनौ ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button