टी नटराजन भारतीय कसोटी संघात सामील, परंतु शार्दुल ठाकूरला मिळू शकेल सिडनी कसोटीमध्ये संधी

Shardul Thakur - T. Natarajan

टीम इंडियाचा (Team India) वेगवान गोलंदाज उमेश यादवला (Umesh Yadav) मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे सिडनी कसोटीत खेळणे जवळजवळ अशक्य झाले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघ व्यवस्थापन जखमी उमेश यादवच्या जागी टी नटराजन (T. Natarajan) किंवा शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) खेळवू शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार स्नायूच्या दुखापतीमुळे तिसर्‍या कसोटीतून बाहेर झालेल्या उमेश चौथी कसोटी देखील खेळू शकणार नाही आणि रिहैबिलिटेशनसाठी घरी गेला आहे. तिसरा कसोटी सामना सिडनी येथे ७ जानेवारी २०२१ रोजी खेळला जाईल.

मंडळाच्या एका सूत्राने सांगितले की, “टी. नटराजनच्या कामगिरीने सर्वांनाच आनंद झाला आहे. परंतु त्यांनी हे विसरू नये की त्याने तमिळनाडूसाठी फक्त एक प्रथम श्रेणी सामना खेळला आहे. शार्दुल मुंबईसाठी सतत घरगुती क्रिकेट खेळत आहे. शार्दुल दुखापतीमुळे एकही ओव्हर न फेकता वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला होता. तो प्लेइंग इलेव्हनमध्ये उमेशची जागा घेऊ शकेल.”

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri), काळजीवाहू कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण हे सिडनी येथे पोहोचल्यानंतर निर्णय घेतील. शार्दुलने आतापर्यंत ६२ प्रथम श्रेणी सामन्यांत २०६ बळी घेतले आहेत. त्याने ६ अर्धशतकेही ठोकली आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना तो एक चांगला फलंदाज म्हणून उदयास आला आहे. उमेश बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहैबिलिटेशन कार्यक्रमाचे अनुसरण करेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER