‘सिस्टम फ़ेल’; आता ‘जन की बात’ करा; राहुल गांधींनी उडवली मोदींची खिल्ली

Rahul Gandhi-PM Modi

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तसेच दिवसेंदिवस रुग्ण संख्येतही वाढ होत आहे. संकटाच्या या काळात विरोधी पक्षही सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी ट्विट करून पंतप्रधान मोदींची (PM Modi) खिल्ली उडवली.

“यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता ‘जन की बात’ करा. या संकटात देशाला जबाबदार नागरिकांची गरज आहे. काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनो सर्व राजकीय काम सोडा आणि जनतेला मदत करा. कोणत्याही परिस्थितीत देशातील जनतेची दु:ख दूर करा. काँग्रेसचा हाच धर्म आहे.” असे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी हे सातत्याने ट्विटद्वारे केंद्र सरकारला सल्ले देतात. “केंद्राच्या कारभारावर ताशेरे ओढत आहेत. केंद्र सरकारने पीआर आणि अनावश्यक प्रकल्पांवर खर्च करण्याऐवजी वॅक्सीन आणि ऑक्सिजन व इतर सेवांकडे लक्ष द्यावे. हे आमचे नम्र आवाहन आहे. येणाऱ्या काळात हे संकट अधिक गंभीर होणार आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी देशाने सज्ज राहिले पाहिजे. सध्याची परिस्थिती अत्यंत वेदनादायी आहे.” असे राहुल गांधी म्हणाले.

देशातील रुग्ण संख्या

देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. पुन्हा एकदा ३ लाखांच्यावर रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासात देशात ३ लाख ४९ हजार ६९१ रुग्ण आढळले. तर २ हजार ७६७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात २ लाख १७ हजार ११३ रुग्ण बरे होऊन घरी पोहोचलेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि दिल्लीतही रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. देशात ऑक्सिजनसह बेड्सचीही कमतरता भासत आहे. त्याशिवाय अनेक राज्यांमध्ये लस संपल्याने लसीकरण केंद्रही बंद करावे लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button