मी आयुष्यभर आपल्या मातृभूमीची सेवा केली, पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही : कारगिल युद्धातील जवानाचा संताप अनावर

Maharashtra Today

मुंबई : देशभरात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात मोठे संकट निर्माण केला . फक्त सर्वसामान्यच नाही तर देशसेवा करणारेही या परिस्थितीत हतबल झाले आहेत.

कारगिल युद्धातील हिरो सुभेदार मेजर (Subhedar Major) (निवृत्त) हरी राम दुबे (Ram Dubey) यांना करोनामुळे आपला मुलगा गमवावा लागला आहे. आपल्या ३१ वर्षीय मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी कित्येक तास वाट पहावी लागली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

निवृत्त झालेल्या हरी राम दुबे यांनी कानपूरमधील हॉलेट रुग्णालयात बोलताना सांगितलं की, “मी १९८१ ते २०११ पर्यंत आपल्या मातृभूमीची सेवा केली. कारगिल ते बारामुल्ला, लडाख ते लुकुंग येथे मी कर्तव्य बजावलं. मी बारामुल्ला येथे दहशतवाद्यांना ठार केलं आणि कारगिलमध्ये पाकिस्तानविरोधात लढा दिला. पण ही सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही. मंगळवारी संध्याकाळी त्याचं करोनाने निधन झालं”.

मुलाचा मृतदेह पाहण्यासाठी हरी राम दुबे यांना आपली पत्नी, मुलगी आणि सुनेसोबत कित्येक तास वाट पहावी लागली. नंतर अखेर कुटुंबाला पीपीई किट घालून मृतदेह पाहण्याची परवानगी देण्यात आली. “मी केलेल्या कामाबद्दल लष्कर प्रमुखांकडून प्रमाणपत्र देऊन माझा गौरव करण्यात आला होता. मी कारगिल युद्धात सहभागी होतो. मी दहशतवाद्यांशी लढलो, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही आणि आता कागदपत्रांसाठी पळवत आहेत. माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे आणि ही वागणूक म्हणजे छळ आहे, असे हरी राम दुबे यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button