सर्दीची लक्षण, ३ वर्षांची बालिका एकटीच गेली डॉक्टरांकडे …

girl went to the doctor alone - Maharashtra today

नागालँड :- हे दुर्गम, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे राज्य. झुन्हेबोटो जिल्ह्याच्या घठाशी तालुक्यातल्या हेबोलिमी हेल्थ सेंटरमध्ये तीन वर्षांची एक बालिका – लिपावी आली. तिच्यासोबत कोणीही नव्हत. मास्क घालून आलेल्या लिपावीची चौकशी केल्यानंतर तिच्या उत्तरांनी आरोग्य केंद्रातल्या कर्मचारी आणि डॉक्टरांना धक्का बसला.

तिला रात्रीपासून सर्दीसारखी लक्षण जाणवत होती. आई-वडील सकाळी लवकर शेतात कामावर गेले होते. आरोग्य केंद्र तिच्या घराजवरच आहे म्हणून ती एकटीच आरोग्य केंद्रात गेली, असे एका वृत्तपत्राने म्हटले आहे.

नागालँडच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बेंजामिन येप्थोमी यांनी ही मुलगी आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनाही टॅग केले आहे.

बेंजामिन येप्थोमी यांनी म्हटले आहे की – तिने किरकोळ लक्षण असूनही दुर्लक्ष केले नाही. तपासणीसाठी जाताना मास्क घालायला ती विसरली नाही. त्या केंद्रातल्या कम्युनिटी हेल्थ ऑफिसरनी (Community Health Officer) तिला तपासल आणि औषध दिली. तिचे कौतुकही केले.

फक्त तीनच वर्षांची मुलगी एकटीच आरोग्य केंद्रात कशी जाऊ शकते, अशी शंका काही नेटीजन्सने व्यक्त केली आहे. त्यावर बेंजामिन यांनी उत्तर दिले – ती दुर्गम गावातली असून, तिथे आरोग्य केंद्र तिच्या घरापासून अगदी सहज चालत जाण्याएवढ्या अंतरावर आहे.

वयस्कर माणस कोरोनाची चाचणी करून घेण्यास किंवा लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करताना दिसतात. अशा स्थितीत लहान, निरागस लिपावीकडे पाहून दिलासा मिळतो. जबाबदारीने वागण ही काळाची गरज आहे, असे बेंजामिन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटर युझर्सनी लिपावीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. मोठ्या माणसांनी अशी जागरूकता आणि जबाबदारीचे भान दाखवले पाहिजे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. लहान खेड्यात राहूनही आपल्या मुलीला चांगली शिकवण दिल्याबद्दल अनेकांनी तिच्या पालकांचेही कौतुक केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button