
भारत आणि आॕस्ट्रेलियादरम्यानच्या (IND Vs AUS) सिडनी कसोटीत एक गमतीशीर बाब घडली आहे. आकड्यांच्या खेळातून ती समोर आली आहे. या सामन्यात आतापर्यंत चार दिवसांचा खेळ झाला आहे आणि या प्रत्येक दिवशी दिवसअखेरची धावसंख्या दोन बाद xxx अशी काही होती.
बघू या कसे ते…
पहिला दिवस- आॕस्ट्रेलिया – 2 बाद 166
दुसरा दिवस – भारत – 2 बाद 96
तिसरा दिवस – आॕस्ट्रेलिया – 2 बाद 103
चौथा दिवस – भारत – 2 बाद 98
याप्रकारे प्रत्येक दिवसअखेर दोन बाद xxx अशीच काहीशी धावसंख्या राहिली आहे. आता उद्या सामन्याचा शेवटचा दिवस आहे. या दोनच्या योगायोगानुसार उद्या भारत दोन गडी राखून हा सामना जिंकणार की आॕस्ट्रेलिया दोन धावांनी विजयी होणार याची उत्सूकता आहे.
याशिवाय दिवसअखेरच्या या धावसंख्यांमध्ये नाबाद राहिलेले फलंदाजही योगायोगाने तेच होते आणि त्यांचा धावांचा क्रमही सारखाच होता. म्हणजे जो पहिल्या व दुसऱ्या दिवशी अधिक धावा काढून नाबाद होता त्याच्याच नावावर तिसऱ्या व चौथ्या दिवशीसुध्दा नाबाद अधिक धावा होत्या.
कसे ते बघू या..
पहिला दिवस – मार्नस लाबुशेन 67 व स्टिव्ह स्मिथ 31
दुसरा दिवस – चेतेश्वर पुजारा 9, अजिंक्य रहाणे 5
तिसरा दिवस- मार्नस लाबुशेन 47, स्टिव्ह स्मिथ 29
चौथा दिवस – चेतेश्वर पुजारा 9, अजिंक्य रहाणे 4
त्यामुळे हा विलक्षण योगायोग बघायला मिळाला आहे.
ही बातमी पण वाचा : IND vs AUS Sydney Test Day 4 LIVE: ऑस्ट्रेलियाचा डाव घोषित, भारताला ४०७ धावांचे लक्ष्य
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला