टॉप सीड सिमोना हालेपला धक्का, स्वायटेकने केला हिशेब चुकता

Simona Halep - Iga Świątek

पॅरिस : आधीच अनपेक्षित निकाल लागत असलेल्या फ्रेंच ओपन टेनिस (French Open Tennis). स्पर्धेत पोलंडची (Poland) बिगर मानांकित खेळाडू इगा स्वायटेक (Iga Świątek) हिने अग्रमानांकित (टॉप सीड) सिमोना हालेपला (Simona Halep) पराभवाचा धक्का दिला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. चौथ्या फेरीचा हा सामना स्वायटेकने 6-1, 6-2 असा सहज जिंकला आणि गेल्यावर्षीच्या पराभवाचा हिशेब चुकता केला.

ह्याच सिमोना हालेपने गेल्यावर्षी स्वायटेकचा चौथ्या फेरीतच 6-1, ^^6-0 असा फक्त 45 मिनिटातच धुव्वा उडवला होता.

स्वायटेक ही फक्त 19 वर्षांची असून क्रमवारीत 54 व्या स्थानी आहे. मात्र शनिवारी तिने आपल्या जोरदार फोरहँडच्या जोरावर हालेपला निष्प्रभ केले. 29 वर्षीय हालेपने याआधीचे सलग 19 सामने जिंकलेले होते. त्यात क्ले कोर्टवरील सलग 13 विजयांचा समावेश होता. प्राग ओपन व इटालीयन ओपनच्या विजेतेपदासह ती या स्पर्धेत उतरली होती. आदल्याच फेरीत तिने अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हा हिचा ^6-0, 6-1 असा धुव्वा उडवला होता. स्वायटेकविरुध्दच्या लढतीआधी हाल्ेप हीच विजेतेपदाची दावेदार मानली जात होती.

२०१८ च्या विजेत्या हालेपच्या पराभवापाठोपाठ इटालीच्या मार्टिना ट्रेव्हिसान हिने पाचव्या मानांकित किकी बर्टेन्स हिला बाद केले. १५९ व्या क्रमांकावर असलेल्या मार्टिनाने हा सामना 6-4, 6-4 असा जिंकला. तिने आधीच्या सामन्यांमध्ये कोको गॉफ व मारिया सक्कारी यांचे आव्हान संपवले आहे.

मी स्वप्नवत काळात आहे जे वास्तवात येत आहे असे म्हणणाºया मार्टिनाने पात्रता स्पर्धेतून आता थेट अंतिम आठात धडक मारली आहे.

यंदाच्या या स्पर्धेत नंबर वन अ‍ॅशली बार्टी सहभागी झालेली नाही. युएस ओपन जिंकणाºया नाओमी ओसाकाने स्पर्धा सुरु होण्याआधीच माघार घेतली तर सेरेना विल्यम्स हिलासुध्दा टाचेच्या दुखण्यामुळे दुसºया फेरीआधीच ही स्पर्धा सोडूनद्यावी लागली. त्यामुळे हालेपच विजेतेपदाची दावेदार समजली जात होती. मात्र आता हालेपच्या पराभवानंतर यंदा या स्पर्धेत एकही गतविजेती शिल्लक नसून नवा चेहरा विजेता म्हणून समोर येणार आहे. 32 मानांकित खेळाडूंपैकी केवळ चार जणीच आता आपले आव्हान टिकवून आहेत. त्यात एलिना स्वितोलीना, सोफिया केनिन, पेत्रा क्विटोव्हा आणि ओन्स जबीर यांचा समावेश आहे.

स्वायटेकचे वडील हे आॅलिम्पिकमध्ये खेळलेले नौकानयनपटू (रोवर) आहेत. त्यांनी 1988 च्या आॅलिम्पिकमध्ये भाग घेतला होता.

या पराभवानंतर सिमोना हालेप म्हणाली की ती आज फारच छान खेळली. विजयाचे श्रेय तिलाच जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER