सूज – वेळीच लक्ष देणे गरजेचे !

अंगावर सूज येणे किंवा एखाद्या भागावर सूज येणे बऱ्याच कारणांनी येत असते. एखादेवेळी काही वेळाकरीता सूज येऊन काही न करताही नाहीशी होते. बऱ्याचवेळा सूज हे लक्षण लक्ष न दिल्याने मोठ्या गंभीर आजारात परावर्तित होते किंवा एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण सूज येणे हे होऊ शकते. आयुर्वेदात यावर काय वर्णन आहे ते बघूया शोथ कशामुळे येऊ शकतो त्याची कारणे काय असू शकतात याचे वर्णन आचार्यांनी केले आहे.

ताप असल्यास अंगावर सूज येऊ शकते. बऱ्याचवेळा आपण बघतो तापेमधे चेहरा सूजलेला वाटतो. तापेच्या उष्णतेमुळे ओठ सुजतात कोरडे पडतात. अर्थात ही सूज ताप गेल्यावर कमी होते.

खारट आंबट, उष्ण, हिरव्या पालेभाज्या, पाण्याचे अति सेवन सूज येण्याचे कारण असू शकते.

दिवसा झोपणे किंवा रात्री सतत जागरण हे सुद्धा अंगावर सूज येण्याचे कारण बऱ्याचवेळा आढळते.

माती खाण्याची किंवा पेन्सिल खडू खाण्याची सवय असल्यास रक्ताल्पता होऊन अंगावर सूज येते.

अजीर्ण अपचन असतांना परिश्रम मेहनतीचे काम करणे किंवा खूप अंतर चालणे हे सुद्धा अंगावर सूज येण्याचे कारण असू शकते.

अनेक आजार असे आहेत की ज्यामधे अंगावर किंवा पायावर चेहर्‍यावर सूज येते. उदा. दमा, खोकला, अतिसार, मूळव्याध, जलोदर, नागीण, पाण्डु असे विकार काही वेळा एकाच भागावर सूज येते. उदा. आघात झाल्यास, शस्त्राचा मार, पडल्यामुळे, मुका मार. ही सर्व कारणे काही काळापर्यंत सूज येण्याची आहेत. अर्थात ही सूज काही काळापर्यंत असते. कारणांची चिकित्सा झाली की आपोआप सूज कमी होते.

  • बिब्बा, खाजकुहुलीच्या स्पर्शाने सूज येऊ शकते.
  • बऱ्याच वेळी अति थंड बर्फाच्या स्पर्शाने सूज येते.
  • किटक दंश, विषारी प्राण्यांच्या स्पर्शानेसुद्धा पटकन सूज आहे.
  • शोथ हा सार्वदैहिक, एकांग असू असतो. कधी पसरलेला कधी उंचवटा असलेला, गाठीच्या स्वरूपात सूज दिसते.
  • चेहर्‍यावर पायावर सूज येणे व वाढत जाणे हे लक्षण दिसल्यास लगेच तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे.

Vaidya Sharwari Sandeep Mishal

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER