गोड बोलणे अन् पाठीत सुरी खुपसने; उद्धव ठाकरेंना बारामतीची हवा जास्तच मानवलेली दिसतेय ; संभाजी ब्रिगेडचा निशाणा

Shmbhaji Brigade - Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पत्र लिहून केंद्र सरकारनं मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेऊन केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत आरक्षण द्यावं, अशी मागणी केली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या पत्रावरुन संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले . ते मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पुन्हा एकदा मराठा समाजाला मूर्ख बनवण्याचा कार्यक्रम सुरु झाला आहे. माननीय गायकवाड आयोग स्वीकारुन सरसकट ओबीसी समावेश जे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत आहे त्या विकल्पाकडे ठरवून दुर्लक्ष करून केंद्राकडे बोटं दाखवून हात झटकण्याचा घृणास्पद प्रकार मुख्यमंत्री करत आहेत. ज्या व्यक्तीने कधीही शब्द बदलला नाही अशा बाळासाहेबांचे ते वारस आहेत, परंतु सध्या बारामतीची हवा त्यांना जरा जास्तच मानवलेली दिसतेय, ”गोड बोलणे आणि पाठीत सुरी खुपसने”, असं म्हणत सौरभ खेडेकर यांनी निशाणा साधला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या पर्यायाविषयी सूतोवाच केले होते. मात्र, आता हा पर्याय पूर्णपणे बाजूला सारण्यात आला आहे. अजित पवार यांनी मराठ्यांचा घात करु नये, असे वक्तव्य सौरभ खेडेकर यांनी केले आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button