परिस्थितीमुळे शिक्षण सोडलेल्या महिलांना परत शिक्षणांचं दारं खुलं करणारी स्वरस्वती!

Ranjana Kumari

आजच्या काळात विचार केला तर आपल्याला अनेक क्षेत्रात भरारी घेतांना अनेक महिला दिसून येतात. असं कोणतंच क्षेत्र उरलेलं नाही जिथे महिला मागे आहेत. प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना महिला दिसून येतात. अनेक मोठ्या पदांवरही महिला विराजमान झालेल्या आहेत. आपल्या हक्कांसाठी लढतानाही त्या स्त्री शक्तीची जाणीव समाजाला करून देत असतात.

चूल आणि मूल एवढंच काम महिलांच्या समोर वाढून ठेवलेलं असताना, सगळ्या साखळदंडातून मुक्त होऊन आज महिला त्यांच्या हुशारीच्या आणि हिमतीच्या जोरावर जे काम करताना दिसतात त्यातलंच एक महत्वाचं नाव आहे रंजना कुमारी !

याच रंजना कुमारींच्या (Ranjana Kumari) आयुष्यावर आजच्या लेखात एक नजर टाकणार आहोत. या जाणून घेऊया कोण आहेत रंजना कुमारी.

बनारस मध्ये जन्माला आलेली हि छोटीशी मुलगी पुढे जाऊन समाजासाठी काहीतरी मोठं काम करेल असं कुणाच्या ध्यानात अन मनातही नव्हतं. मुलीचं नाव ठेवलं रंजना कुमारी. त्यांचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी होते. एवढंच नाही तर ते बॅनर्स मध्ये असलेल्या प्रसिद्ध काशी विद्यापीठाचे संस्थापक सदस्यही होते.

रंजना यांचे वडील बनारसी साडीचे उत्पादक होते. त्यामुळे त्याची कमाईहि चांगली होती. घराची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने रंजना यांना शिक्षण पूर्ण करेपर्यंत विशेष अडचणी आल्या नाहीत. त्या एका अशा घरात मोठ्या होत होत्या जिथे फक्त त्यांचे पुरुष सदस्यच समाजवाद किंवा भाषा किंवा सामाजिक विषयांवर चर्चा करत असत.

रंजना लहानपणापासूनच कट्टर प्रथांच्या विरोधात होत्या. त्यांनी सेंट्रल गर्ल्स, बनारस इथून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी फक्त मुलींच्या महाविद्यालयातून शिक्षण घ्यावं अशी त्यांच्या आज्जीची इच्छा होती. मुलगी मुलांच्या महाविद्यालयात जाऊन शिकली तर इतर जातीच्या किंवा धर्माच्या मुलाच्या प्रेमात पडून लग्न करेल अशी आज्जीला भीती होती.

रंजना आधीपासूनच कट्टर प्रथांच्या विरोधात होत्या. त्यांनी चांगल्या महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना बीएचयुमध्ये प्रवेश घ्यायचा होता. घरातून होणाऱ्या विरोधाला पत्करून शेवटी त्यांनी आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळवलाच. तिथून त्यांनी विज्ञान, मनोविज्ञान आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला.

अथक परिश्रम घेऊन अभ्यास करून त्यांनी शेवटी भारतातळी सर्वोच्च शिक्षण संस्था जवाहरलाल नेहरू विद्यापिठात प्रवेश मिळवला. तिथे त्यांनी राज्यशास्त्राचा अभ्यास केला. राज्यशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

त्यांनतर त्यांना दिल्ल्ली विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून नोकरी मिळाली. नोकरीसोबतच त्यांनी जेएनयू मधून एम फिल आणि पीएचडी सुरु ठेवली. त्याकाळी हुंडा देण्याची प्रथा सुरूच होती आणि या विरोधात अनेक आंदोलनं होत होती. आपल्या पीएचडीच्या प्रबंधात त्यांनी भारताच्या पंचायती राज व्यवस्थेवर चर्चा केली. महिलांचे अधिकार आणि प्रतिनिधित्व या गोष्टीवर त्या नेहमी विचार करत असायच्या म्हणून त्यांनी राजकारणाशी जोडलेला हा मुद्दाही पंचायतीमधल्या महिलांच्या प्रतिनिधित्वाकडे ववळवून त्यावर पीएचडीच्या थेसीसमध्ये मांडला.

महिलांच्या प्रश्नअस्तही काहीतरी केलं पाहिजे या विचारातून त्यांनी त्यांची प्राध्यपिकेची नोकरीही सोडली. या विषयांवर फक्त पुस्तकं लिहून काहीच होणार नाही या विचारावर त्या येऊन पोहोचल्या होत्या.

त्यांनी प्राध्यापिकेची नोकरी सोडून सीएसआर म्हणजेच सेंटर फॉर सोशल रिसर्चही एनजीओ सुरु केली. याची स्थापना फक्त महिलांसाठीच झाली नव्हती तर समाजातील जाती, धर्म, वर्ण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वंचित आणि बहिष्कृत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही संस्था काम करू लागली. संस्था सुरु केल्यानांतर अनेक अडचनींना रंजना यांना सामोरं जावं लागलं. या काळात रंजना यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. परंतु नोकरी सोडून त्या परत आल्या आणि त्यांनी संस्थेचं काम सुरु ठेवलं.

सीएसआर या संस्थेचं भारताच्या महिलांना आणि मुलींना सशक्त बनवणं हे मिशन आहे. त्यांना प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी ही संस्था काम करते. अनेक गरीब मुलींना या संस्थेच्या माध्यामातून रंजना यांनी शिक्षण घेण्यास मदत केली आहे. रंजना यांनी शिक्षण अपूर्ण सोडलेल्या मुलींचा गावोगावी जाऊन शोध घेतला आणि अशा २०० मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था केली.
ज्या कुटुंबांची आर्थिक स्थिती चांगली नाही त्या घरच्या महिलांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी मार्गदर्शन आणि मदत रंजना कुमारी करत असतात. विकास भारती मध्ये या महिलांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली जाते. आज अशा अनेक महिला स्वयंरोजगार निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत.

महिलांना प्रत्येक क्षेत्रात एक तृतीयांश जागांवर आरक्षण मिळालं पाहिजे अशी डॉ. रंजना कुमारी यांची मागणी आहे.

रंजना यांची या कामामुळे जगभर ओळख झाली. आणता त्या जगातल्या अनेक संस्थांच्या वेगवेगळ्य्या पदांवर काम पाहतात. यसोबतच रंजना आंतराराष्ट्रीय श्रम संघटनेच्या टास्क फोर्सच्या सदस्याही होत्या.

रंजना केवळ सामाजिक कार्यकर्त्यांचं नाही तर एक उत्तम लेखिकाही आहेत. “जेंडर, वर्क एंड पॉवर रिलेशंस: केस स्टडी ऑफ हरयाणा”, “दहेज पीड़ित महिलाएं” ही त्यांची प्रमुख पुस्तकं आहेत.

समाजकार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या डॉ. रंजना कुमारी सर्वांसाठीच एक आदर्श आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER