राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत स्वरांगिनी वडेर ला सुवर्ण पदक

सांगली :- सांगलीत नुकत्याच पार पडलेल्या खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सांगलीच्या स्वरांगिणी विक‘ांत वडेर हिने कॅडेट ग‘ुप मध्ये सुवर्णपदक पटकावले. तिच्या या यशाबद्दल विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.

पोलिसांविरोधात उपोषण न करण्यासाठी फिल्टरची मागणी करणाऱ्या ओबीसी महासंघाच्या नेत्याला अटक

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राजारामबापू पाटील चॅरिटेबल ट्रस्टने पहिल्या जयंत चषक खुल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धांचे आयोजन सांगलीत केले होते. या स्पर्धेत कॅडेट विभागात सांगली येथील तायक्वांदो असोसिएशन सांगली जिल्हा शिवाजी स्टेडियम शाखेची खेळाडू आणि सॅन्थोम स्कुलची विद्यार्थिनी स्वरांगिणी विक‘ांत वडेर हिने कॅडेट ग‘ुप मध्ये सुवर्णपदक पटकावले. तिची पुढील राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत राज्यातील 14 जिल्ह्यातून सुमारे 750 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.