चार वर्ष वय लपवले होते स्वरा भास्करने

Swara Bhaskar

पुरुषांना पगार आणि बायकांना वय विचारू नये असे म्हटले जाते. कारण हे दोघेही या दोन्ही गोष्टी कधीही खऱ्या सांगत नाहीत. याची प्रचिती अभिनेत्री स्वरा भास्करच्या निमित्ताने पुन्हा एकदा आली आहे. स्वराने जवळ-जवळ चार वर्ष स्वतःचे वय लपवले होते. स्वतः स्वरानेच एका मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे.

स्वरा भास्करने 2018 मध्ये आलेल्या ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. नील बट्टे सन्नाटा, रांझना, प्रेम रतन धन पायो, तनु वेड्स मनुसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्वरा बिनधास्त असून केंद्र सरकारवर ती सतत टीका करीत असते. त्यामुळे ती वादातही सापडले आणि मोठ्या प्रमाणावर ट्रोलही होत असते.

32 वर्षीय स्वराने सांगितले, जवळ जवळ चार वर्ष मी माझे वय 28 सांगत आली आहे. मात्र कोणाचा त्यावर विश्वास बसला नाही हेसुद्धा खरे आहे. मी जेव्हा 30 वर्षांची झाले तेव्हा एक केक कापला. मात्र त्या केकवर 25 वर्ष लिहिलेले होते. मी तेव्हा माझे खरे वय त्यांना सांगत होते परंतु कोणीही त्यावर विश्वास ठेवला नाही. एक अभिनेत्री म्हणून मला समाजात जे दिसते त्यावर मी व्यक्त होते. तसेच मला जे वाटते तेसुद्धा मी बोलून दाखवते. आता मी 32 वर्षांची आहे. परंतु गेले काही वर्ष मी 28 वर्षांचीच होती. मात्र आता माझे खरे वय समोर आल्याने मी आता खरे सांगण्याचा निर्णय घेतला आहे. असेही स्वराने मुलाखतीत सांगितले.

स्वरा मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत असल्याने आता तिच्या या गौप्यस्फोटामुळेही ती पुन्हा ट्रोल होईल यात शंका नाही. जी वय लपवते तिच्यावर काय विश्वास ठेवायचा असा प्रश्नही प्रेक्षकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER