जयंत पाटलांना ‘स्वामिनी’ने दिली यवतमाळ जिल्ह्याच्या दारूबंदीची आठवण

Jayant Patil

यवतमाळ : राज्यात फडणवीस (Fadnavis) यांचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) दारूबंदीची समर्थक होती. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा विषय विधिमंडळात मांडला होता. आमचे (आघाडी) सरकार (Mahavikas Aghadi) आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. यवतमाळमध्ये अजून दारूबंदी झालेली नाही. मविआ सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी रद्द केल्यानंतर हा यवतमाळ जिल्यात दारूबंदीचा विषय चर्चेत आला आहे.

हकिगत अशी की, राज्यात फडणवीस यांचे सरकार असताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. सुप्रिया सुळे ‘संघर्ष यात्रे’निमित्त यवतमाळात आले असताना स्वामिनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी केली. जयंत पाटील यांनी विधिमंडळात हा विषय मांडला. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होते तर यवतमाळ जिल्ह्यात का होत नाही, या प्रश्नाचे उत्तर सुधीर मुनगंटीवार यांनी द्यावे, अशी मागणी केली व मुंगनटीवारांनी दारूबंदी नाही केली तर आमचे (आघाडी) सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते.

महिलांना दिलेला शब्द खरा करा

२०१९ मध्ये सत्तांतर होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. जयंत पाटील जलसंपदामंत्री झाले. मात्र यवतमाळच्या दारूबंदी संदर्भात दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला, तो आजतागायत. आजपर्यंत मंत्रिमंडळाच्या ६७ बैठका झाल्या, मात्र एकाही बैठकीत यवतमाळच्या दारूबंदीची आठवण जयंत पाटील यांना झाली नाही. जयंत पाटील यांनी यवतमाळातील महिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवावा, असे आव्हान ‘स्वामिनी दारूबंदी आंदोलना’चे अध्यक्ष महेश पवार यांनी दिले आहे.

मुनगंटीवारांनी शब्द पाळला

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, २००९ ते २०१४ या कालावधीत राज्यात आघाडीचे सरकार असताना चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी आंदोलनांची दखल घेत चंद्रपूरचे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत येताच चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याचा शब्द दिला होता. २०१४ मध्ये सत्तांतर होऊन राज्यात भाजप, सेनेचे सरकार आले. त्यावेळी पहिल्याच अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय जाहीर केला व शब्द पाळला. १ एप्रिल २०१५ पासून तिथे दारूबंदी झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button