मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावली युवासेना, थेट शाळेलाच ठोकले टाळे

swami-vivekananda-academy-Yuvasena

औरंगाबाद : चिकलठाणा येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीने (Swami Vivekananda Academy) कुठलीही नोटीस न देता शाळेतील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना टिसी पोस्टाने पाठवून शाळा बंद करण्यात येतअसल्याची माहिती दिली. तसेच उर्वरीत फि भरण्याची सूचनाही पालकांना केली. यासंदर्भात पालकांनी युवासेनेच्या (Yuvasena) पदाधिकार्यांची भेट घेतली. याप्रकरणाची शहानिशा करण्यासाठी पदाधिकार्यांनी शाळा गाठली. मात्र, शाळेकडून कोणताच प्रतिसान न मिळाल्याने युवासैनिकांनी शाळेला टाळे टोकले.

युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच संस्थाचालकांना यासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात यश आले नाही. दरम्यान याची माहिती मिळताच पोलिसांनीही शाळा गाठली. पोलीस आणि पदाधिकाऱ्यांमध्ये यावेळी शाब्दीक चकमकही उडाली. शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भवितव्याशी शाळेने खेळू नये.

शिक्षणाधिकार्यांनी शाळा बंदचा प्रस्ताव फेटाळलेला असतांना विद्यार्थ्यांना टिसी कशी देण्यात आली. या मनमानीविरोधात तिव्र आंदोलन छेडू असा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख हनुमान शिंदे यांनी दिला. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षकांसह युवासैनिकांची उपस्थिती होती. यासंबंधी शाळा प्रशासनाची बाजु समजुन घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही. तर पालकांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त, पोलीस निरिक्षक, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडेही यासंदर्भात तक्रार दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button