स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केलाच नव्हता

Swami Chinmayanand

लखनऊ :- माजी केंद्रीय मंत्री व भाजपाचे खासदार स्वामी चिन्मयानंद यांच्यावर (Swami Chinmayanand) गेल्या वर्षी लैंगिक अत्याचाराचा (sexual harassment) आरोप केलेल्या विद्यार्थिनीने मंगळवारी न्यायालयात आपली आधीची जबानी फिरविली व अभियोग पक्ष म्हणतो तसा आरोप आपण चिन्मयानंद यांच्यावर केल्याचा  साफ इन्कार केला.

आमदार-खासदारांवरील फौजदारी खटले चालविण्यासाठी येथे स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात या  विद्यार्थिनीला चिन्मयानंद यांच्यावरील खटल्यातील फिर्यादी म्हणून सरतपासणीसाठी साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभे केले गेले. न्यायालयापुढे साक्ष देताना तिने आधी पोलिसांकडे दिलेली आपली जबानी फिरविली.  फिर्यादी मुलीने अशा प्रकारे आधीची जबानी फिरवताच अभियोग पक्षातर्फे पब्लिक प्रॉसिक्युटर अभय त्रिपाठी यांनी तिच्याविरुद्ध  दंड  प्रक्रिया संहितेच्या कलम ३४० अन्वये ‘पज्युरी’ची (Perjury) कारवाई करण्यासाठी लगेच अर्ज सादर केला. सत्र न्यायाधीश पी. के. राय यांनी त्या अर्जाची प्रत आरोपी व फिर्यादी मुलीस देण्यास सांगून त्यावरील सुनावणी लगेच बुधवारी ठेवली.

ही फिर्यादी मुलगी सहारनपूर येथील ज्या विधी महाविद्यालयात शिकते ते चिन्मयानंद यांंच्या ट्रस्टतर्फे चालविले जाते. गेल्या वर्षी ५ सप्टेंबर रोजी तिने दिल्लीत लोधी गार्डन पोलीस ठाण्यात चिन्मयानंद यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली. नंतर तिच्या वडिलांनीही अशीच फिर्याद सहारनपूरमध्ये दाखल केली होती. दोन्ही फिर्यादी एकत्र करून चिन्मयानंद यांच्यावर खटला भरला गेला. फिर्यादीनंतर लगेच चिन्मयानंद यांना अटक झाली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्यांना यंदाच्या फेब्रुवारीत जामीन मंजूर केला होता.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या आत्मचरित्रात असत्य माहिती ; बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्रात आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER