स्वामी अग्निवेश यांचे निधन

Swami Agnivesh

दिल्ली : सामाजिक व राजकीय कार्यकर्ते स्वामी अग्निवेश (८०) यांचे आज सायंकाळी साडे सहाच्या सुमाराला आईएलबीएस रुग्णालयात निधन झाले.

स्वामीजी ‘लिवर सिरोसिस’ने आजारी होते. त्यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल केले होते. काल त्यांच्या काही अवयवांनी काम करणे बंद केल्यानंतर त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले होते. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना सायंकाळी ६ वाजता ह्रदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले.

हरयाणाचे शिक्षणमंत्री

अग्निवेश यांनी १९७० ला ‘आर्यसभा’ हा पक्ष स्थापन केला. १९७७ ला हरयाणा विधानसभेत निवडून आले. शिक्षणमंत्री म्हणून काम केले. १९८१ ला ‘बंधुआ मुक्ती मोर्चा’ची स्थापना केली. अण्णा हजारेंच्या आंदोलनात आणि ‘बिग बॉस’ मध्येही ! २०११ ला अण्णा हजारेंच्या आंदोलनात स्वामी अग्निवेश यांनी भाग घेतला. नंतर मतभेदांमुळे बाहेर पडलेत. रियलिटी शो ‘बिग बॉस’च्या घरातही गेले. ३ दिवस मुक्काम केला !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER