स्वाभिमानीचे उद्या रात्रभर आत्मक्लेश जागर आंदोलन

Raju Shetti

कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच केंद्र सरकारला सुबुध्दी येऊ दे, या मागणीसाठी 3 डिसेंबर रोजी रात्री ८ वाजल्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत “रात्रभर आत्मक्लेश जागर” आंदोलन करणार असल्याची माहिती राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली.

याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले की, केंद्र सरकारने (Central Government) देशातील शेतकर्यांच्यावर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतकर्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत ७ दिवसापासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडीत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार केवळ वेळकाढूची भूमिका घेत आहेत. *त्या शेतकर्यांना पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जागर आंदोलन करण्यात येणार आहे.* रात्री पिठलं भाकरं खाऊन या आंदोलनाला सुरूवात केली जाणार आहे. रात्रभर भजन आणि किर्तन केले जाणार आहे. केंद्र सरकारला सुबुध्दी दे व शेतकर्यांना न्याय मिळू दे या मागणीसाठी आत्मक्लेश जागर आंदोलन केले जाणार असून रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत जागर होणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER