कडाक्याच्या थंडीत स्वाभिमानीचे जागर आंदोलन

Raju Shetty Kolhapur

कोल्हापूर : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी गुरूवारी रात्रभर कडाक्याच्या थंडीत आत्मक्लेष केला. रात्री आठ वाजल्यापासून भजन किर्तन करत कार्यकर्त्यांनी जागर आंदोलन केले. शेती आणि शेतकऱ्यांच्या धोरणांबाबत केंद्र सरकारला बुध्दी येवू दे, अशी मागणी यानिमित्ताने आंदोलकांनी केली.

रात्री पिठलं भाकरी खाऊन या आंदोलनाला सुरूवात झाली. यानंतर कार्यकर्त्यांनी रात्रभर भजन आणि किर्तन केले. सकाळी सहा वाजता आंदोलनाची सांगता केली. याबाबत शेट्टी म्हणाले , केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर तीन कृषी कायदे लादले आहेत. हे कायदे अन्यायी असून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. दिल्लीत आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीत देशभरातील शेतकरी कुडकुडीत बसले आहेत. तरीही केंद्र सरकार वेळकाढूची भूमिका घेत आहेत. त्या शेतकर्यांना पाठिंबा म्हणून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे जागर आंदोलन केले.

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जर्नादन पाटील, अजित पोवार, सागर शंभूशेटे, विक्रम पाटील, राम शिंदे, संजय चौगले, शैलेश आडके, विठ्ठल मोरे, रमेश भोजकर, अण्णा मगदूम, बाळासाहेब पाटील, अविनाश मगदूम, पायगोंडा पाटील, भिगोंड पाटील, राजू पाटील, सचिन शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER