तळी उचलणाऱ्या एका संपादकाला त्यांना वाचवायचे आहे ; राजू शेट्टी संतापले

Raju Shetty

मुंबई :- रिपब्लिक टीव्ही (Republic TV) वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab goswami arrest) यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गोस्वामी यांना अटक झाल्यामुळे भाजप नेत्यांनी राज्यभरात आंदोलनं पुकारले आहे. याप्रकरणी शेतकरी नेते आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी अर्णब गोस्वामींच्या अटकेवरुन टीका करणाऱ्या भाजपाविरोधात संताप व्यक्त केला आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

त्यांना त्यांची तळी उचलणाऱ्या एका संपादकाला वाचवायचं आहे. पण हे करत असताना एका महिलेच्या पती आणि सासूने आत्महत्या केली असून कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे हे विसरता कामा नये. एका कुटुंबाचं दुख: दिसत नाही पण संपादकांचं दुख दिसतं. जर माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं म्हणून कुटुंब आत्महत्या करत असेल तर तो कितीही मोठा माणूस असला तरी कारवाई झालीच पाहिजे,” असे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. भाजपाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही असा टोलाही त्यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : एफआरपी देवून उपकार केले नाही : राजू शेट्टी यांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER