…अन्यथा पालकमंत्र्यांकडे मोर्चा वळवू ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

स्वाभिमानी शेतकारी संघटना - सतेज पाटील

कोल्हापूर :- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) २ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद आयोजित केली आहे. गेली १९ वर्षे आयोजित होणाऱ्या या ऊस परिषदेत शेतकऱ्यांची मागील देणी, तसेच एकरकमी एफआरपी आणि जादा पैसे याबाबत निर्णय होतो. परिषदेला दोन दिवस बाकी आहेत. मात्र पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी आपला गगनबावडा येथील साखर कारखाना सुरू ठेवला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसदराबाबत आतापर्यंत पालकमंत्री समन्वय घडवून, दोन ते तीन बैठका घेऊनच यातून तोडगा काढत असतात.

मात्र पालकमंत्री सतेज पाटील यांनी हा पायंडा मोडून काढला. ऊसदराचा प्रश्न निकाली लागण्यापूर्वीच आपला साखर कारखाना सुरू ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपला साखर कारखाना बंद ठेवावा, अन्यथा ऊसदराबाबतचा मोर्चा त्यांच्याकडे वाढवावा लागेल. एकरकमी एफआरपी अधिक ज्यादा किती पैसे शेतकऱ्यांना साखर कारखानदार देणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यातील शेतकऱ्यांचे जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेकडे लक्ष लागले आहे. तरी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपला कारखाना बंद करून संघर्ष टाळावा, असे आवाहन प्रा. जालंदर पाटील यांनी केले.

ही बातमी पण वाचा : कोल्हापूर विमानतळ भूसंपादनासाठी दहा कोटींचा निधी मंजूर : ना. सतेज पाटील

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER