आमच्या हातात दगड आहे ध्यानात ठेवा : राजू शेट्टी

Raju Shetty

कोल्हापूर : बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही कायदा कराल. पण लक्षात ठेवा सध्याच्या युगात बळीला पाताळात गाडणे एवढे सोपे नाही. शेतीमालाचा हमीभाव हा शेतकऱ्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. तो तुम्ही हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्यास देशातील करोडो शेतकऱ्यांची पोरे हातात दगड घेतल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्यावेळेला तुमच्या फक्त काचाच शिल्लक राहतील, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला. काल राज्यसभेत कृषी क्षेत्राशी संबंधीत विधेयक मंजूर झाले. या विधेयकांना विरोध केला जात आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी विधेयकांवर टीका केली.

राज्यसभेत मंजूर झालेला कायदा हा शेतकऱ्यांना कार्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारा असून केंद्र सरकारने हा कायदा संमत करून चुकीचं केले आहे. सरकार हमीभावाच्या जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत आहे. देशात कॉन्ट्रक्ट शेती असल्यास शेतकऱ्यांचे भले होईल, असे आभासी चित्र निर्माण केले जात आहे. देशभरातील शेतकर्यांच्या संघटना या विधेयकाचा यासाठीच विरोध करत आहेत. कार्पोरेट कंपन्या शेतकऱ्यांना हमीभाव द्यायला बांधील नाहीत, मग यातून शेतकऱ्यांना हमीभाव कसा मिळणार ? याची कुठेही या कायद्यात तरतूद नाही. शेतकऱ्यांना यामधून काहीच मिळणार नाही, कायदा मंजूर केला मात्र त्याची अंमलबजावणी कशी करतात? हे आम्ही पाहतोच, असेही राजू शेट्टी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER