ऊस परिषदेतबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

ठरल्या प्रमाणे ऊस परिषद होणारच : स्वाभिमानीचा निर्णय

Swabhimani Shetkari Sanghatan

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २ नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणारी ऊस परिषद सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून होणारच असा निर्धार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी व्यक्त केला. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना पूर्व कल्पना देवून सोमवारी निवेदन देण्यासाठी पदाधिकारी गेले असता त्यांनी वेळ दिली. दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांना स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन महिन्यापूर्वी पत्र लिहूनही त्यांनी उत्तर दिले नाही. गेल्या १९ वर्षाची स्वाभिमानाची परंपरा आम्ही खंडित करणार नाही,असे प्रा. पाटील यांनी स्पष्ट केले.

जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर २ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९वी ऊस परिषद होत आहे. राज्यभरातून शेतकरी या ऊस परिषदेसाठी उपस्थित असतात. ऊस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी उभारलेले हे व्यासपीठ आहे. या परिषदेत शेतकरी ऊस दर आणि उचलीबाबत मागणी करत असतो. कोरोना महामारीमुळे काही निवडक निमंत्रित शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही परिषद होणार आहे. कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून सर्व कायदेशीर नियम पाळून ही परिषद घेण्यास परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन स्वाभिमानिच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी अनिल मादनाईक, जनार्दन पाटील, रमेश भोजकर, संजय चौगले, विक्रम पाटील, विठ्ठल मोरे, साताप्पा पाटील, मिलींद साखरपे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER