स्वॅब तपासणी अहवाल आता थेट मोबाईलवर

Swab Test Report On Mobile

कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur) केलेल्या स्वॅब तपासणीचा (Swab Test) अहवाल संबंधित रुग्णाच्या मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. सीपीआर, शेंडा पार्क, आयजीएम-इचलकरंजी, आयसोलेशन हॉस्पिटल येथे रोज सरासरी 1300 ते 1500 स्वॅब तपासणी होते. आतापर्यंत सुमारे 80 हजार तपासले गेले.

तपासणी केलेल्या स्वॅबचे अहवाल मिळण्यात सुरूवातील प्रचंड अडचणी येत होत्या. ग्रामीण भागातील व्यक्तीचे अहवाल त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले जात होते, तेथून संबंधितांना ते कळेपर्यंत अनेक प्रश्‍न निर्माण व्हायचे. त्यातून रूग्ण, त्याचे नातेवाईक यांचा डॉक्‍टरांशी वाद हा ठरलेला होता. पुर्वी अहवाल सीपीआरमधील बोर्डवर चिकटवले जायचे; पण आपल्या नातेवाईकांचे नाव शोधताना लोकांना त्रास होत होता. तो आता थांबणार आहे.

छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयासह सरकारी रूग्णालयात कोरोनाच्या तपासणीसाठी दिलेल्या स्वॅबचा अहवाल आता संबंधितांच्या मोबाईलवरच मिळणार आहे. यासाठीचे तंत्रज्ञान राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने शेंडा पार्कातील प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे स्वॅब दिल्यानंतर अहवालाच्या प्रतीक्षेत चार-पाच दिवस असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्याही मोबाईलवर हा संदेश मिळेल. या संदेशाखालीच त्या व्यक्तीच्या अहवालाची प्रत लिंकवर दिली जाणार आहे. या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर संबंधिताला आपल्या अहवालाची प्रिंटही काढता येणार आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे स्वॅब दिलेल्या व्यक्तींबरोबरच त्याच्या कुटुंबीयांची होणारी घालमेलही थांबणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER