सुयशने घेतला ब्रेक

Suyash Tilak

नवा सिनेमा कोणता येतोय . नव्या मालिकेत कोणत्या व्यक्तिरेखेमध्ये पाहायला मिळणार आहेत. कुणासाठी पेड पार्टनरशिप त्यांनी केली आहे. कुठल्या डेस्टिनेशनला ते एन्जोय करत आहेत. नवा लूक .. नवी स्टाईल ऑनस्क्रीन नवं काय .. इतकेच नव्हे तर ऑफस्क्रीन धमाल काय सुरु आहे ..हे सगळे चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सेलिब्रिटींच्या हाताशी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम आहे. याचा पुरेपूर उपयोग सेलिब्रिटी मंडळी करत असतात. पण कधीकधी हाच सोशल मीडिया त्यांच्यासाठी ट्रोलिंग होण्याचे कारण बनतो आणि मग त्यातून एक वेगळाच मनस्ताप कलाकारांना सहन करावा लागतो. यातूनच अनेक अनेक कलाकार सोशल मीडिया पासून ब्रेक घेण्याचं ठरवतात आणि सतत ऑनलाईन दिसणारे हे चेहरे एकदम बटन बंद करावं तसं ऑफलाइन होऊन जातात. अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) हादेखील सध्या असाच सोशल मीडियापासून लांब गेला आहे. ऑफलाइन नाऊ अ न्यू लक्झरी हे वाक्य पोस्ट करत त्यांनी सोशल मिडियाला रामराम ठोकला आहे. अर्थात यामागचे नेमके कारण सुयशलाच माहिती असून काही दिवस तरी सुयश त्याच्या चाहत्यांना ऑनलाईन भेटणार नाही. हा, मात्र तो सध्या साकारत असलेल्या शुभमंगल ऑनलाइन या मालिकेतून त्याच्या चाहत्यांना दर्शन देणार आहे. तसेच लवकरच त्याचा हॅशटॅग प्रेम हा सिनेमा पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे ऑनस्क्रिन सुयशची भेट चाहत्यांशी नक्कीच होणार आहे.

मालिकांमधील लोकप्रिय नायक असलेल्या यादीमध्ये सुयश टिळक याचे नाव आवर्जून घेतलं जातं. दूर्वा या मालिकेत एका छोट्याशा भूमिकेत दिसलेला सुयश त्यानंतर का रे दुरावा, बाप माणूस या मालिकेतील भूमिकेने घराघरात पोहोचला.. त्याची क्लासमेट या सिनेमातील भूमिका देखील त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडली होती. सध्या शुभमंगल ऑनलाइन या मालिकेमध्ये काम करत असून सध्याच्या पिढीचा लग्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यातून घडणार्‍या घटना यावर ही मालिका आधारित आहे. सिनेमा मालिका, नाटक, जाहिराती या माध्यमांमध्ये सक्रिय असलेला सुयश सोशल मीडियावर देखील सतत सक्रिय असतो. सुयशने फक्त पर्यावरण शास्त्राचा अभ्यासच केलेला नाही तर समाजामध्ये पर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींवर देखील सुयश सातत्याने भाष्य करत असतो. केवळ वेगवेगळ्या स्टाईलचे फोटोसेशन करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत नाही तर समाजामधल्या खटकणाऱ्या गोष्टी एक कलाकार म्हणून तसेच माणूस म्हणून तो सातत्याने लोकांसमोर मांडत असतो. त्यामुळेच सुयशचं ऑनलाईन असणं हे त्याच्या चाहत्यांसाठी एक वेगळ्याअर्थाचा संवाद होता. परंतु आता सुयश ऑफलाईन जात असल्याचं सांगताना अनेकदा कलाकार म्हणून वेगवेगळ्या गोष्टींना होणारे ट्रोलिंग हे नकोसं वाटणारं आहे असा मुद्दा उपस्थित करत सुयशने सध्याच्या लोकप्रिय सोशल मीडिया माध्यमाला गुडबाय केला आहे.

काही दिवसांपूर्वी सुयश आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. सुयश आणि अक्षया यांचे एकत्र फोटो अनेकदा सोशल मीडियावर व त्यांच्या पेजवर पोस्ट होत होते. मात्र अचानक त्या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. यावरही सुयश व्यक्त झाला होता आणि त्यानेही त्याने अशा प्रकारच्या कलाकारांच्या पर्सनल आयुष्यामध्ये काय घडतय याच्या चर्चा करण्यापेक्षा कलाकारांच्या कामाविषयी बोला अशी पोस्ट केली होती. एकूणच सोशल मीडिया हे कलाकारांसाठी त्यांचं काम किंवा त्यांच्या नव्या गोष्टीचे प्रमोशन करण्यासाठी प्रभावी असलं तरी अनेकदा कलाकारांच्या खासगी आयुष्यात डोकावताना ट्रोल करण्याचा प्रकार प्रेक्षकांकडून व नेटकऱ्यांकडून होत असतो आणि आता कलाकार म्हणून अनेकदा प्रत्येकालाच त्रास होत असतो. कुठेतरी आहे थांबण्याची गरज होती आणि सध्या मला असं वाटतं की काही वेळ मी या माध्यमांपासून दूर गेलो तर मी एक शांत आणि माझा स्वतःचा वेळ मला मिळेल असं आयुष्य जगू शकेन असं पोस्ट मध्ये सुयशने म्हटलं आहे.

सुयश अचानक ऑफलाईन जाण्याने त्याचे चाहते नक्कीच नाराज झाले आहेत. अर्थात सुयशने, मी काही दिवसच या माध्यमात पासून लांब जात असल्याचे सांगितल्यामुळे थोड्या दिवसांनी का असेना सुयश आपल्याला सोशल मीडियापेज वर नक्की भेटेल अशी आशा त्याच्या चाहत्यांमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER