भाजपला धक्का ; सांगलीत जयंत पाटलांनी पालिकेवर फडकावला राष्ट्रवादीचा झेंडा

Jayant Patil - Sangli Mahanagar palika

मुंबई : सांगली मिरज कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीने (NCP) भाजपला (BJP) जोरदार धक्का देत आपला झेंडा फडकावला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने विज मिळविला आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौरपदाचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी विजयी झाली आहे.

सांगली महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज पार पडली. याअगोदर या महापालिकेवर भाजपचे वर्चस्व होते .पण, अखेर आज मतदान प्रक्रिया पार पडली आणि राष्ट्रवादीने सत्ता खेचून आणली.

जपचे विजय घाडगे, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम आणि नसीमा नाईक या भाजपा नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विजयाचा मार्ग खुला झाला .

महापौर निवडणुकीसाठी भाजपकडून धीरज सूर्यवंशी, राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी मैदानात उतरले होते. पण, आधीच भाजपचे सात नगरसेवक हे राष्ट्रवादीच्या गळाला लागले होते. त्यामुळे सांगली महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात जाणार अशी दाट शक्यता होती. सकाळी 11 वाजता कोरोनाच्या काळामुळे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. यात भाजपाची पाच मते फुटली. या पाचही नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER