अर्णबला मारहाण करणाऱ्या त्या नऊ पोलिसांना निलंबित करा; राम कदम यांची राज्यपालांकडे मागणी

Ram Kadam

मुंबई : इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णबने केल्यानंतर भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली.

दरम्यान आता यासंदर्भात आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीत राम कदम यांनी सांगितले की, ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, त्या नऊ  पोलिसांना तत्काळ निलंबित करा आणि त्यांची चौकशी करावी. पोलिसांबद्दल आदर असला तरी मारहाण योग्य नाही, अशी मागणी राम कदम यांनी राज्यपालांकडे केली आहे.

याच प्रकरणात आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवेळी पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करून त्यांना मारहाण केली. या नऊ पोलिसांना निलंबित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER