सुष्मिताने आपल्या मुली समोर ठेवल्या होत्या दोन अटी

sushmita sen with renee sen

बॉलिवूडमधील (Bollywood)कलाकारांची मुले ही लहानपणापासूनच लाइट्स कॅमेरा ॲक्शन हे शब्द ऐकत आणि फिल्मी वातावरणातच वाढत असतात. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनावर बॉलीवूडचे एक सुप्त आकर्षण निर्माण झालेले असते. म्हणूनच कलाकारांची मुले मोठी झाल्यावर बॉलीवूडमध्येच आपले करिअर करण्याचा प्रयत्न करतात. सुष्मिता सेन (Sushmita Sen) ही बॉलिवूडमधली यशस्वी सौंदर्यवती. सुष्मिताने उमेदीच्या काळातच दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. या दोन्ही मुलींचा तिने एकटीने सांभाळ केला. त्यापैकीच एक मुलगी रेने ही मोठी झाली असून तीसुद्धा आई सुष्मिताप्रमाणे बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छिते. रेने ने सुष्मिता च्या ४५ व्या वाढदिवसानिमित्त एका शॉर्ट फिल्मचा ट्रेलर सादर करून सुष्मिता ला वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट दिले.

रेने ‘ सुट्टाबाजी’ नावाच्या एक शॉर्ट फिल्ममधून रुपेरी पडद्यावर आगमन करीत आहे. यात राहुल वोहरा आणि कोमल छाब्रिया यांच्याही भूमिका आहेत. रेने या दोघांच्या मुलीची भूमिका यात साकारत आहे. ही शॉर्ट फिल्म लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवली जाणार आहे. चित्रपटातील प्रवेशाबाबत बोलताना रेनेने सांगितले, मी लहानपणापासूनच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र मम्मीने माझ्यासमोर दोन अटी ठेवल्या होत्या. त्या अटी जर मी पूर्ण करत असेल तरच बॉलिवूडमध्ये ये. असे मम्मीने मला बजावले होते. मी सहा महिन्याची होते तेव्हापासून आईसोबत सेटवर जात असे, त्यामुळे चित्रपटाशी संबंधित बहुतेक सगळ्या गोष्टी मला लहानपणीच माहित झाल्या होत्या. मम्मीला तेव्हा मी डान्स करताना, गाणे गाताना, अभिनय करताना पहायचे तेव्हा मला वाटायचे की आपणही असेच केले पाहिजे.

रेनेने पुढे सांगितले, जेव्हा मी आईला सांगितले की मला अभिनेत्री बनायचे आहे. तेव्हा तिने माझ्यासमोर दोन अटी ठेवल्या. त्यातली पहिली अट होती ग्रॅज्युएशन पूर्ण करण्याची आणि दुसरी अट होती बॉलिवुडमध्ये तुला जे करायचे आहे ते तुला स्वतःच्या बळावरच करावे लागेल. आईच्या या दोन्ही अटी पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीत आहे असेही रेने ने पुढे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER