सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाला नवी ओळख दिली : मोदी

Modi

माजी परराष्ट्र मंत्री, स्व. सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री असताना देश-विदेशात अडकलेल्या लोकांची तातडीने मदत केली. ‘प्रोटोकॉल’शी संबंधित असलेल्या परराष्ट्र खात्याची परिभाषा बदलत ‘प्रोटोकॉल’चं ‘पीपल्स कॉल’मध्ये रुपांतर केलं, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली.


नवी दिल्ली :- माजी परराष्ट्र मंत्री, स्व. सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री असताना देश-विदेशात अडकलेल्या लोकांची तातडीने मदत केली. ‘प्रोटोकॉल’शी संबंधित असलेल्या परराष्ट्र खात्याची परिभाषा बदलत ‘प्रोटोकॉल’चं ‘पीपल्स कॉल’मध्ये रुपांतर केलं, या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली अर्पण केली.

जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. स्वराज यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रत्येकाला मदत केली. ज्यांनी ज्यांनी मदत मागितली त्यांच्यापाठी त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी ट्विटरवर आलेल्या तक्रारींचीही गंभीर दखल घेत त्याचाही निपटारा केला, असं मोदी म्हणाले. सुषमाजी समर्पित कार्यकर्त्या आणि चांगल्या सहकारीही होत्या, त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले, असा व्यक्तिगत अनुभव मोदींनी सांगितलं

देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात देशात केवळ ७० पासपोर्ट कार्यालये होती. मात्र, सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी पाच वर्षात ५०५ पोसपोर्ट कार्यालये उभारली, असा त्यांच्या कामाचा झपाटा होता, या शब्दांत मोदींनी त्यांच्या कामाचे कौतुक केले.