खूनप्रकरणी सुशीलकुमारचा पाच राज्यात घेतला जात आहे शोध!

Sushil Kumar - Maharashtra Today

लॉकडाऊन दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल (Wrestler) सुशीलकुमार (Sushlikumar) हा दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal Stadium) टोळक्याच्या मारहाणीत झालेल्या एका पहिलवानाच्या मृत्यूप्रकरणी अडचणीत आला आहे. या प्रकरणी दाखल खुनाच्या गुन्ह्यात त्याला आरोपी करण्यात आलेले आहेच. शिवाय तो फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लुकआउट नोटीस बजावली आहे. या घटनेत सागर धनकड (Sagar Dhankad) नावाच्या २३ वर्षीय मल्लाचा मृत्यू झाला आहे. या घटनेपासून सुशीलकुमार बेपत्ता आहे.

सागर धनकड हा ज्युनियर गटातील माजी राष्ट्रीय विजेता मल्ल होता. त्याला छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यात त्याचा जीव गेला होता. याप्रकरणी सुशीलकुमारविरुध्द खून, अपहरण आणि षडयंत्राचा गुन्हा नोंदण्यात आला होता.

फरार असलेल्या सुशीलकुमारचा दिल्ली पोलिसांची डझनभर पथके दिल्ली-एनसीआर, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये शोध घेत आहेत. यासंदर्भात सुशीलचे गुरू व त्याचे सासरे सतपाल सिंह यांच्याकडेही चौकशी करण्यात आली पण त्यांनी सुशीलचा ठावठिकाणा आपल्याला माहित नसल्याचे सांगितले. प्राप्त माहितीनुसार सुशील सध्या कायदेशीर सल्ला घेत असून त्यानंतर एक दोन दिवसात तो स्वत:च पोलिसांसमोर हजर होईल अशी शक्यता आहे. सुशीलकुमारचा शेवटचा ठाविठकाणा हरिद्वार येथील मिळाला होता. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद मिळत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button