सुशील चंद्रा नवे मुख्य निवडणूक आयुक्त, पदभार स्वीकारला; राष्ट्रपतींनी केली नियुक्ती

Sushil Chandra new Chief Election Commissioner

नवी दिल्ली :- देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा (Sushil Chandra) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुशील चंद्रा यांनी पदभार स्वीकारला आहे. सध्या ते निवडणूक आयुक्तपदावर कार्यरत आहेत. सर्वांत वरिष्ठ निवडणूक आयुक्तांना मुख्य निवडणूक (Chief Election Commissioner) आयुक्त बनवण्याच्या परंपरेनुसार सुशील चंद्रा यांचे नाव या पदासाठी आधीपासूनच निश्चित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांनी १२ एप्रिलला सुशील चंद्रा यांची देशाचे २४ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. या अगोदर सुनील अरोरा यांच्याकडे मुख्य निवडणूक आयुक्त पदाची जबाबदारी होती.

आता या पदावर सुशील चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ १४ मे २०२२ पर्यंत असणार आहे. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुशील चंद्रा यांना निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक आयोग पुढील वर्षी उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यांमधील निवडणुका पार पाडणार आहे. सुशील चंद्रा हे १९८० च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि दिल्ली या राज्यांतील अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button